। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड नगरपरिषदेतर्फे शहरातील वाचनालय रस्त्यावरील मोरीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेला लागून असलेल्या चौकातील या रस्त्यावरील मोरीचे काम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. यामुळे रस्ता वाहतुकीत एसटी शहरात येत नसल्याने प्रवासी, पर्यटकांना एसटीसाठी मुरुड आगारात जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. खासगी वाहनांचा आधार घेत बाजारपेठेत यावे लागत आहे तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. या मोरीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.







