द्रौपदी मुर्मू देशाच्या १६व्या राष्ट्रपती

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाच्या १६ व्या राष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. मुर्मू या देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. यापूर्वी प्रतिभा पाटील या पहिल्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झालेल्या होत्या.

Exit mobile version