द्रविडने उलगडले यशाचे रहस्य

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत दुसर्‍यांदा टी-20 विश्‍वकरंडक पटकावला. शनिवारी बीसीसीआयकडून करार संपुष्टात आलेले माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ बीसीसीआयकडून पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये राहुल द्रविड यांनी यशाचे रहस्य उलगडताना म्हटले की, मला संघामध्ये जास्त बदल करायला आवडत नाहीत. त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. संघातील वातावरणावरही फरक पडतो. सुरक्षित वातावरणाला मी प्राधान्य देतो. त्यामुळे अपयशाची भीती दूर होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असतो. खेळामध्ये विजयाला महत्त्व आहे, पण मी कर्णधाराच्या दृष्टीला प्राधान्य देतो. प्रकियेकडे लक्ष देतो. त्यासाठी माझ्या काही बाबी निश्‍चित केल्या होत्या. खेळाडूंसाठी आव्हानात्मक परिस्थिती देऊ शकतो का? खेळाडूंकडून सराव करवून घेत आहोत का? तांत्रिकदृष्ट्या आपण सज्ज आहोत का? खेळाडूंना आपल्याकडून सहकार्य मिळते आहे का? आपण योग्य वातावरण निर्माण करीत आहोत का? विजयाआधी या सर्व बाबींची पूर्तता झाली का याकडे कटाक्ष टाकतो, असे राहुल द्रविड सांगतात.

Exit mobile version