बंगळुरू | वृत्तसंस्था |
आयपीएलचा 14 हंगाम सध्या दुबईमध्ये सुरू असून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्या फक्त आणि फक्त आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएलसोबत आणखी एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे ’ड्रीम 11’ हे अॅप्लिकेशन. मात्र आता ड्रीम 11 वापरणार्यांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणार्या नवीन स्थानिक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कर्नाटकमध्ये या ड्रीम 11 अॅपवर एफआयआर दाखल झाला आहे. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये ड्रीम 11 ने सेवा बंद केल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे,
कर्नाटकमध्ये या आठवड्यात अंमलात आलेला कायदा, सट्टेबाजी आणि तत्सम खेळांना, म्हणजेच आर्थिक जोखीम असलेल्या खेळांना परवानगी देत नाही. सेक्वॉया कॅपिटल, मोबाईल प्रीमियर लीगसह अनेक गेमिंग अॅप्सने राज्यातील युजर्सला सेवा देणे बंद केले आहे, परंतु ड्रीम 11 हे अॅप्लीकेशन सुरूच होते.