स्वप्नपूर्ती प्रीमियर लीग; जय महाराष्ट्र विजयी

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघरमध्ये रविवारी (दि.7) स्वप्नपूर्ती प्रीमियर लीग 2024 चे आयोजन विघ्नहर्ता क्रिकेट क्लबच्यावतीने स्वप्नपूर्ती गृह संकुलात करण्यात आले होते. यावेळी अंतिम सामन्यात जय महाराष्ट्र संघाने वीर मराठा संघावर मात करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मालिकावीरचा सन्मान केतन सपकाळ यांना देण्यात आला. तर, उत्कृष्ट गोलंदाज सोमनाथ अहिवळे, उत्कृष्ट फलंदाज विशाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रवीण उतेकर आणि सामनावीर केतन सपकाळ यांना देण्यात आला.

स्वप्नपूर्ती गृह संकुलातील रॉयल 2040 (अविनाश तांबे), स्वप्नपूर्ती योद्धा (धनंजय वैद्य), वरे एक्सप्रेस (प्रवीण वरे), मातोश्री ट्रॅव्हल्स (राम गव्हाणे), जॉय इलेव्हन (धनराज शेट्टी), स्वप्नपूर्ती स्ट्रायकर्स (प्रमोद घेवारे), वीर मराठा (राम उतेकर), द मेवरिक (तुषार सुवर्णकार, स्वप्निल भरते), जय महाराष्ट्र (शशिकांत गायकवाड, केतन सपकाळ), जी के फायटर्स (रोहित शिर्के,गौरव कांबळे) या संघानी सहभाग घेतला होता.

या क्रिकेट सामन्यांचे आयोजन चेतन सपकाळ, अविनाश तांबे, करण येवतकर, धनंजय वैद्य, पंकज भोसले, सतीश कांबळे, प्रवीण वरे, आरंभ कदम, शशिकांत गायकवाड, केतन सपकाळ, विश्‍व जगताप, राम गव्हाणे, प्रवीण उतेकर, जे.के. कांबळे, सचिन ढवळे, प्रदीप उतेकर, प्रमोद येवारे, रोहित शिर्के, आदित्य सकपाळ, प्रवीण गायकवाड आदींनी विशेष मेहनत घेऊन पार पाडले.

Exit mobile version