। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
सायन-पनवेल महामार्गवरील खारघर खाडी पुलावरुन एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि कार थेट पाण्यात कोसळली. यात कारचालक जोबिन बेनिदीप्त (42) याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
स्विफ्ट कार (केए 41 पी 3447) वरील चालक शुक्रवारी (दि.14) मुंबईहून पुण्याकडे जात होता. रात्री दहाच्या सुमारास त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाचे रेलिंग तोडून थेट 20 ते 25 फूट खाली पाण्यात कोसळली. या घटनेत कारचालक जोबिन याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने गाडीला पाण्यातून बाहेर काढले. या अपघातात कारचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.







