| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळानजीक घोणसे घाटात झालेल्या वाहन अपघात प्रकरणी तालुका न्यायालयाने आरोपी चालक सद्दाम हुसेन याला दीड वर्षे कारावासाी शिक्षा ठोठावली आहे.
11 ऑक्टोबर रोजी सिमेंट ब्लॉकची वाहतूक करणार्या मालवाहू ट्रेलरला अपघात होऊन त्यामध्ये खरसई येथील महिला देवका रामा भूनेसर आणि अन्य एक जखमी पुरुष यांचा मृत्यू झाला होता.
सदरच्या अपघातास होण्यास चालक सद्दाम हुसेन हाच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले असल्याने म्हसळा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात खटला दाखल केला होता. तेथे सुनावणी होऊन आरोपीस दिड वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.