। उरण । वार्ताहर ।
पागोटे परिसरातील मार्गावर माती भरून भरधाव वेगाने जाणार्या दोन डंपरचा भीषण अपघात होऊन चालकाचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू होण्याची घटना घडली. सदर डंपर एवढा भरधाव होता की दुसर्या डंपरवर आदळला असता डंपरची केबिनचा चुरा होऊन त्यात अडकून चालकाचा मृत्यू झाला.
सदर मृतदेह हा डंपरचा भाग कापून काढावा लागला. त्यामुळे अपघाताची तीव्रता लक्षात येते.या दुर्घटनेची नोंद उरण पोलिसात करण्यात आली आहे.