गवत वाढल्याने वाहनचालक त्रस्त

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रहदारी असलेला कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यात आले आहे. या दुपदरी रस्त्याच्या मध्ये असलेल्या जागेत झाडे लावण्याचे ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेत सांगण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध झाडे लावली नाहीत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. दरम्यान,रस्त्यात काही ठिकाणी उगवलेले गवत हे वाहनचालक यांच्यासाठी डोकेदुखी बनले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हायब्रीड तत्वावर कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत असलेल्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. त्या दुपदरी रस्त्यावर कर्जत तालुक्यात रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात झाडे लावण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे निर्देश होते. रस्त्याचे मजबुतीकरण मार्च 2020 मध्ये पूर्ण झाले असून आजतागात संबंधित रस्त्याचे करोडो रुपयांचे काम करणार्‍या ठेकेदाराने दुभाजकात झाडे लावली नाहीत.कर्जत तालुका हद्दीत असलेल्या 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्यात जेमतेम एक किलोमीटर भागात दुभाजक नाहीत.अन्य 20 किलोमीटर भागात असलेल्या दुभाजकात झाडे लावण्याचे संबंधित टेंडर मध्ये नमूद करण्यात आले होते. सध्याचा पावसाळा गेला तरी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात झाडे लावण्यात आली नाहीत.दुपदरी रस्त्याचा दुभाजक शोभिवंत झाडे न लावता तसाच ठेवण्यात आलेल्या आता त्या मोकळ्या जागेत गवत उगवले आहे. हे गवत रस्त्याने वाहतूक करणार्‍या वाहनचालक यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण काही दुभाजकात उगवलेले गवत हे चार फुटाची उंचीचे झाले आहे. त्यामुळे वाहनचालक यांना वाहने दिसत नाहीत. त्यामुळे कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे झाडे लावली गेली नाहीत. याबाबत ठेकेदाराच्या भूमिकेमुळे जोरदार टीका होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्या कडून रस्त्याची सर्व कामे व्हावीत यासाठी पाठपुरावा असतो. मात्र ठेकेदाराने निविदा स्वीकारताना मंजूर असलेली कामे करायला हवीत यासाठी पत्र देऊ.

Exit mobile version