| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषद हद्दीमधील सर्व रस्ते सुंदर व खड्डे मुक्त असणारा जुनी पेठ येथील रस्ता सध्या मातीमय झाल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. मुरुड जुनी पेठ येथील काही वाडीत कामे चालू असल्याने वाडीतील माती डंपरमधुन नेत असताना ती माती रस्त्यावर पडत जात असल्याने संपूर्ण रस्ता मातीमय झाला आहेत. हीच माती हवेने आजुबाजुच्या घरात जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रस्त्यावर गाडी चालवता वाहन चालकांच्या नाकात, घसात माती जात असल्याने वाहन चालक सुध्दा त्रस्त झाले आहेत. तरी प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन रस्तावर पडलेली माती लवकरात लवकर साफ करावी अशी मागणी वाहन चालक व नागरिक करीत आहेत.