। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व द्रोणागिरी स्पोर्ट्स उरण पुरस्कृत जिल्हा स्तरीय हौशी शरीर सौष्ठव ‘द्रोणागिरी रायगड श्री’ व ‘द्रोणागिरी रायगड फिजिक’ या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा सोमवारी (दि.23) उरणमधील यबोकडवीरा येथे पार पडल्या. या स्पर्धेत ‘द्रोणागिरी रायगड श्री’चा किताब हार्ड कोर जिम उरणचा अमित पाटील याने, तर ‘द्रोणागिरी रायगड फिजिक’चा किताब टॉरनस जिम द्रोणागिरीच्या राकेश तांडेल याने पटकावला आहे. तसेच, बेस्ट पोझरचा सन्मान थ्री ऑक्सिजन जिम पेणच्या मनीष म्हात्रे याला मिळाला आहे.
दरम्यान, द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष सर्वश्री घरत, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, संतोष साखरे, जितेंद्र गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंच म्हणून राष्ट्रीय पंच सर्वश्री, सचिन पाटील, जितेंद्र गुरव व सुरेंद्र महाडिक यांनी काम पाहिले. स्पर्धेचे गुणलेखन राष्ट्रीय पंच भगवान सावंत यांनी केले. स्पर्धेचे सुत्रसंचलन राष्ट्रीय पंच संतोष साखरे तर स्टेज मार्शल म्हणून सर्वश्री रुईकर, प्रतीक दरणे व प्रथमेश नागे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवेंद्र म्हात्रे यांनी केले.