उरण | वार्ताहर |
सिडकोने सध्या उलवे, द्रोणागिरीतील विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या नोडमध्ये कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, विकासकामांना मर्यादा आहेत.
सिडकोने द्रोणागिरी नोडमधील 50 मीटर बफर झोनमधील विविध 23 विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. त्यावर सीआरझेड प्राधिकरणाने सिडकोकडून खुलासा मागितला आहे. ही सर्व कामे सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहेत. संपूर्ण नवी मुंबई शहर हे ठाणे खाडीमुळे सीआरझेडच्या परिघात मोडते. यामुळे या शहरात कोणतेही विकासकामे करताना नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका असो वा सिडको महामंडळ अथवा एमएमआरडीए या प्रत्येकाला ही कामे विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची अर्थात सीआरझेडची मान्यता घ्यावी लागते. अशाच प्रकारे सिडकोने द्रोणागिरी नोडमधील 50 मीटर बफर झोनमधील विविध 23 विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. या विकासकामांमध्ये तीन कामे सीव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट, पंप हाऊसची आहेत. तर, सेक्टर-51,52 आणि 55,56 मधील होल्डिंग पॉडवरील पूल, 22 मीटरचा नाला बांधणे, आठ नाल्यांची सफाई, आठ सेवा रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.
सीआरझेडच्या 160 व्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता प्राधिकरणाने सिडकोकडून ठोस खुलासा व स्पष्टीकरण मागितले आहे. यात प्राधिकरणाने म्हटले आहे, सिडकोने ही कामे आधीच पूर्ण केली आहेत काय, की सिडको नव्याने परवानगी मागत आहे, की कार्योत्तर मंजुरी मागत आहे. सीआरझेड प्राधिकरणाच्या या प्रश्नांना उत्तरे आता सिडकोला द्यावी लाणगार आहेत. पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधितसीव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्पसेक्टर 56 व 59 मध्ये 61698 चौरस मीटर क्षेत्रात 108 एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून, त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड 1 ए मध्ये मोडतो. तर सेक्टर 51 ए मध्ये 5915 चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार.