| पनवेल | प्रतिनिधी |
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बोकडविरा येथील नवी मुंबई सेझ मैदानावर यावेळी क्रीडापट्टूंनी क्रीडाज्योत द्रोणागिरी देवी करंजा येथून प्रवीण घरत, राम, सरोज कदम, प्रियांशी पाटील, भरत म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी नवी मुंबई सेज मैदानात आणली. त्यानंतर त्या मैदानात एक फेरी मारून त्या ज्योतीने असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी मैदानातील ज्योत प्रज्वलीत केली. त्यानंरत या कामगार नेते तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी झेंडा फडकवला. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थांनी लेझिम, कवायत आणि आगरी कोळी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सर्व खेळाडूंना क्रीडाशपथ देण्यात आली.
यावेळी महेंद्र घरत म्हणाले की, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन 25 वर्ष दिमाखात चालू आहे. त्याचे श्रेय महादेव घरत आणि त्यांच्या सोबत असलेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या सदस्यांना जाते. द्रोणागिरी स्पोर्ट्समुळे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून द्रोणागिरी भूषण पुरस्काराने काम करणाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळते असे सांगून द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी यावर्षी आणि दरवर्षी 1 लाख रुपये देणगी देण्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद खारपाटील, उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळाचे प्रमुख पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे, पुंडलिक म्हात्रे, संदीप पाटील, फिरोज शेख, मधु निमकर, सरिता खेरवासिया, शुभांगिनी पाटील, प्रज्ञा म्हात्रे, वैशाली घरत, भक्ती घरत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.







