अँटी ड्रोन यंत्रणा नसल्यानं चिंता वाढली
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रावर सध्या ड्रोन हल्ल्याचं सावट वावरत आहे. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रीपोर्टमधून समोर आली आहे. मात्र याबद्दलची धक्कादाय माहिती अशी की, राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर कोणतीच सुरक्षा यंत्रणा नसल्याचं सांगितलं जात आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्याचा गृहविभाग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्र सायबर सेलचे अधिक्षक यशस्वी यादव यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी लागणार आहे. ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर स्फोटकं बसवता येतात. याशिवाय, त्यांचा पाठलाग करणेही कठीण आहे. आरोपीने मोबाईल फोन वापरला असेल तर त्याचा आयएमईआय क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोनला ऑपरेट करता येत नाही. अनेकदा संशयित व्यक्ती डार्क नेट वर ड्रोन हल्ला, रासायनिक पदार्थाचा हल्ला करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे.