वेळे आधीच बोटी किनाऱ्यावर
| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
कोकणातील मच्छिमार गेली 10 वर्षे सतत अवकाळी पाऊस, वादळीवारा, समुद्रात रासायनिक प्रदूषण व अनधिकृत एलइडी मासेमारीमुळे दुष्काळाला समोरा जात आहे. खरंतर कोळी बांधवांचे जीवन सतत धोक्याचे बनत चालले आहे. प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे माशांचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच, कारखान्यांतील विषारी वायू थेट नदीत सोडले जातात आणि हेच पाणी समुद्रामध्ये येऊन मिसळले जाते. त्यामुळे माश्यांवर विपरीत परिणाम होऊन दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मासेमारीचा खर्च वाढत चालला असून उत्पन्नात घट होउ लागली आहे. त्यामुळेच यावर्षी मुरुड परिसरातील कोळी बांधवानी वेळे आधीच आपल्या बोटी किनारी ओढल्या.
