वीर वाजेकर महाविद्यालयात ‌‘अंमली पदार्थमुक्त भारत’ अभियान

| चिरनेर | प्रतिनिधी |

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे येथे ‌‘अंमली पदार्थमुक्त भारत’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम तसेच त्याचा व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास सुमित केंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी, प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन डॉ. रत्नमाला जावळे यांनी केले. यावेळी पोलीस अधिकारी, हवालदार घनश्याम पाटील तसेच डॉ. राहुल पाटील, डॉ. वाधवा आणि डॉ. धरती घरत, प्रा श्रीकांत गोटपागर उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. ‌‘नशामुक्त युवा, नशामुक्त समाज’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Exit mobile version