| कल्याण | प्रतिनिधी |
उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी 131 ग्रॅम वजनाचा मॅफेरोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता आलेल्या एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले. यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना माहिती मिळाली कि, एक महिला हिललाइन पोलीस ठाणे परिसरातील नेवाळी भागात एमडी हा अंमली पदार्थ विक्री करीता घेऊन येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रीरंग गोसावी, गणेश गावडे, थोरवे, योगेश वाघ, रितेश वंजारी, मीनाक्षी खेडेकर, कुसुम शिंदे या पोलीस पथकाने नेवाळी भागात सापळा रचून 26वर्षीय नौशिन मैनुद्दीन शेख या महिलेला शिताफीने ताब्यात घेतले. तिच्याकडून 71.03 ग्राम वजनाचे एमडी या अंमली पदार्थासह 14 लाख 31 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिच्या इतर चार साथीदारांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 60 ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या छाप्यात एकूण 26 लाख 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उल्हासनगरातून अंमली पदार्थ जप्त
