मुंबईत पकडले 16 कोटींचे ड्रग्ज

सोलापुरातील दोघांना पोलिस कोठडी
| सोलापूर | प्रतिनिधी |

मोहोळजवळील चिंचोली औद्योगिक वसाहतीतील एका फॅक्टरीवर मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या नऊ क्रमांकाच्या पथकाने धडक कारवाई करीत त्या कंपनीला सील ठोकले आहे. मुंबईत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केले. या पथकाचे प्रमुख तथा इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने बंदी घातलेले एमडी हे रासायनिक अमली पदार्थ आरोग्यासाठी फार घातक मानले जाते. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने त्याठिकाणी राहुल गवळी व अतुल गवळी यांच्या ताब्यातून आठ किलो म्हणजेच अंदाजे 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले, त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Exit mobile version