‘सुके कोळंबी सोडे रस्सा’ आता फक्त श्रीमंतासाठी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

सुके कोळंबी  सोडे, मच्छी मार्केटला खवय्यांची मोठी मागणी असते. नित्याने  पर्यटक, पै-पाहूणे, मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमनी यांची सुकी मच्छी विक्रेत्यांकडे सुके सोडे खरेदीची मागणी असते. सुके कोळंबी सोडे विक्रीचा दर किलोस 1200 ते 1500/- रूपये असा गगनाला भिडल्याने सुके कोळंबी  सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतासाठीच…! असे म्हणायची वेळ आली आहे.

सुके कोळंबी सोडे रस्सा खवय्यांच्या खास आवडीचा. तिखट झणझणीत बटाट घालून सुके कोळंबी सोडे रस्सा जेवताना चार घास जास्त पोटात घालावयासं लावतो. मोठी कोळंबी सुकवून त्यांचे सोडे बनवून कोळी बांधव-भगिनी विक्रीस ठेवतात. सुके कोळंबी  सोडे चांगला भाव मिळवून देत असल्याने थोडेसे अधिक कष्ट घेत जास्त रक्कम वसूली सुके कोळंबी  सोडे देतात. त्यामुळे मोठी कोळंबी  मिळाली की, सुके कोंळबी सोडे बनविण्यावर कोळी समाज भगिनी-बांधव अधिक लक्ष केंद्रीत करतात.

तरीही सुके कोळंबी सोडे खरेदीची मागणी मोठी असल्याचे आग्राव, थेरोंडा, कोर्लई येथील प्रसिध्द मच्छी खरेदी विक्रेते व सुकी मच्छी  व्यावसायीक यांनी सांगितले. स्थानिकांसह पर्यटक, पै-पाहूणे, मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमनी सुके कोंळबी सोडे यांची सुकी मच्छी विक्रेत्यांकडे खरेदीला झुंबड असते.

Exit mobile version