| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळा संपल्यानंतर जाणवणारा उकाडा हळूहळू कमी होत असून, पनवेल परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. सकाळी फिरायला जाणारे नागरिक, व्यायामप्रेमी आणि दुचाकीस्वारांना थंडीचा अनुभव येत आहे. ग्रामीण पनवेलमधील मोकळे परिसर, शेतशिवार आणि डोंगररांगांच्या पायथ्याशी पहाटे धुक्याची चादर पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. धुक्यामुळे झाडे, शेती आणि डोंगररांगा धूसर दिसत असून परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या दि.20 नोव्हेंबरच्या अंदाजानुसार, पनवेलमध्ये किमान तापमान 19 अंश, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा हिवाळा तुलनेने उबदार राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पनवेल परिसरात रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला, तरी दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. तापमानातील चढ-उतार आणि वाढते वायुप्रदूषण व धूळ यांमुळे नागरिकांना घशाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत घसा दुखणे, खवखवणे, जळजळ होणे, गिळताना त्रास होणे आणि आवाज बसणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. या त्रासांमुळे उपचारासाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बदलत्या हवामानामुळे घशाला कोरड
