। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
श्री भैरवनाथ प्रसन्न नागशेत आदिवासी वाडी व ग्रामस्थ मंडळ नागशेत यांच्या वतीने रविवार (2)रोजी आदिवासी कातकरी, आदिवासी ठाकूर व धनगर या समाजाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 45 संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना खैरवाडी विरुद्ध डुबेवाडी या दोन संघात झाला. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपला बहारदार खेळ केला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक खैरवाडी या संघास रोख रक्कम 10 हजार व चषक, द्वितीय क्रमांक डुबेवाडी संघास रोख रक्कम सात हजार व चषक, तृतीय क्रमांक उंबरवाडी संघास रोख रक्कम तीन हजार व चषक, चतुर्थ क्रमांक राबगाव संघास रोख रक्कम तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
नागशेत कबड्डी स्पर्धेत डुबेवाडी संघ उपविजेता
