| सुतारवाडी | वार्ताहर |
यावर्षी मार्च महिन्यापासून प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. या उष्म्यामुळे नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी तसेच बळीराजाला आपल्या शेतीची मशागत करायला खोळंबा होत आहे.
वाळंजवाडी, पहुर, ढोकलेवाडी, गौळवाडी, कामथ, दुरटोली, सुतारवाडी, पाथरशेत, जामगाव तसेच अन्य वरकस भागांतील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथील शेतीच्या मशागतीची कामं एप्रिल महिन्यापासून शेतकरी वर्ग सुरू करतो. मात्र, यावर्षी प्रचंड प्रमाणावर उन्हाळा जाणवत असल्यामुळे बळीराजाला रखरखत्या उन्हात काम करणं अशक्य होत असल्यामुळे यावर्षी पावसाळ्या पूर्वीची शेतीच्या मशागतीची कामं खोळंबळी आहेत.





