। पाताळगंगा । वार्ताहर ।
आत्मा योजने अंतर्गत शेतकरी वर्गास मोठ्या प्रमाणे सहकार्य करीत असून या माध्यमातून डोंगराळ तसेच माळरान पठारावर 10 शेतकरी बांधवांनी एकत्र ऐवून कणगर लागवड करण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी दोन शेतकरी लागवड करीत होते. मात्र कृषी खात्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्यास दहा शेतकरीवर्ग ही कणगर लागवड करण्यास तयार झाले.
पुर्वी मोठ्या प्रमाणात कंदमुळे आणि भाजीपाल्याची लागवड केली जात होती. शेतकरी वर्गास शेतीतून अधिक उत्पन्न मिळवून तो सक्षम होवू शकतो. यासाठी त्यांनी मेहनत करणे महत्वाचे आहे. शिवाय दर वर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गास प्रशिक्षण शिबीर देण्यात येते. यामुळे शेतकरीवर्ग शेतीकडे वळले जातील. शेतकरी वर्गाने एकत्र येऊन कंदमुळ आणि भाजीपाला लागवड कशा पद्धतीने करावी यांचे प्रात्यक्षिके करुन दाखविले.
कणगर लागवड केल्यास 180 ते 200 दिवसात पुर्ण होत असते. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने कंदमुळ आणी भाजीपाला लागवड तसेच बियाने बद्दल व त्यांचे उत्पन्न वाढविणे अथवा विक्री अथवा व्यवस्थापक या विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नाचणी तुर बियाणे वाटप करण्यात आले.या उपक्रमाला आत्मा योजनेचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी- अर्चना सुळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रज्ञा पाटील, कृषी सहाय्यक उदय भोसले यांचे मोलाचे योगदान शेतकरी वर्गास लाभत आहे.