पावसामुळे राब झाले हिरवेगार

शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त

| पाताळगंगा | वार्ताहर |

सात जूनला पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, राब हे उत्तम तयार होत आहेत. दिवसातून पावसाच्या तुरळक सरी येत असल्यामुळे राबांना संजीवनी मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी सज्ज झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. दरवर्षी पाऊस नियोजित वेळेवर पडेल याची शाश्वती नसते. मात्र, यावर्षी 7 जूनला पावसाने हजेरी लावली असून, दररोज राबांचे शिंपणे करीत आहे. त्यामुळे शेतातील राबही चांगले उगवले असून, हिरवेगार दिसत आहेत.

Exit mobile version