शिवाजी पार्कवर घुमणार ठाकरेंचाच आवाज

Maharashtra, October 09 (ANI): Shiv Sena chief Uddhav Thackeray addressing the Dussehra rally at Shivaji Park in Mumbai on Tuesday. (ANI Photo)

दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. यंदाही शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

शिंदेंचं एक पाऊल मागे
मंत्री दीपक केसरकरांनी शिंदे गट शिवाजी पार्क नाहीतर क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर दसरा मेळावा घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटानं मागे घेतला होता. शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

दरम्यान, शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे.

Exit mobile version