फुलबाजार सोन्याने सजला
| रायगड | प्रतिनिधी |
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने फुल बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. रायगड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा फुलांनी व सोन्याने म्हणजेच आपट्याच्या हिरव्या पानांनी सजली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून, फुलांच्या किमती वाढल्या आहेत.
बाजारात पिवळा, भगवा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. 80 ते 150 रुपये किलो भावाने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती 100 ते 200 रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार 100 रुपये, तोरण 50 ते 100 रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा 10 ते 20 रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.
फुलांचे भाव
पिवळा झेंडू - 70 रु.
भगवा झेंडू - 70 रु.
आपट्याची पाने - 10 - 20 रु.
करडू फुले - 10 ते 20रु.
आंब्याची पाने- 20 - 30 रु.
भाताच्या लाह्या - 10 - 20 रु.
गुलाब - 20 रु.
कमळ - 20 नग
पिवळा अष्टर - 80 - 100
जांभळी अष्टर - 100
गजरा - 20 रु.
एक वेणी - 40 रु.
एक सुट्टे गुलाब - 100 रु.
नामधारी गोंडा - 80 रु. किलो.
20-50 टक्क्यांनी वाढ
पावसामुळे फुलांचे नुकसान झाले असून बाजारात आवक घटली आहे. तर, काही ठिकाणी माल खराब होत आहे. परिणामी, फुलांच्या दरात वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.
