द्वारकानाथ हनुमंते यांचे निधन

| रसायनी | प्रतिनिधी |

चौक शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल हनुमंते यांचे वडील आणि चौक परिसरातील पहिल्या पिठाच्या चक्कीचे प्रणेते द्वारकानाथ रामचंद्र हनुमंते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्षे होते. चौक परिसरातील आणि चौक गावातील पहिल्या पिठाच्या चक्कीचे ते संस्थापक आहेत. द्वारकानाथ हनुमंते यांना वृत्तपत्र आणि साहित्य वाचनाची आवड होती. व्यापार करताना त्यांनी शेतीच्या विकासासाठी आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. एक आदर्श व्यतिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात मुलगा चौक व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हर्षल हनुमंते, पत्नी, दोन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version