मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते उद्घाटन
। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यायलच्या आवारात ई-कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 या अंर्तगत या हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उरण नगरपरिषदेच्या माध्यमातून उरण मधील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की,त्यांनी आपला ई-कचरा योग्य प्रकारे रिसायकल करावा नाहीतर त्यामुळे प्रदूषण वाढते. इलेक्ट्रॉनिक पार्ट, मोबाईल हेडफोन, टीव्ही अन्य उपकरणे जेव्हा बंद पडतात, ती उरण नगरपरिषदेच्या ई-कचरा केंद्रात आणून द्यावे येथून ते शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.