भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र, महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी सर्रास सिमेंट ऐवजी मातीचा वापर केला आहे. त्यामुळे भविष्यात विद्युत वाहक पोल पडून अपघात होऊन नागरिकांच्या व त्या ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या गायी, म्हशी यांच्या जीवातास धोका निर्माण होणार आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या भ्रष्ट कारभाराची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाढते औद्योगिकीकरण आणि अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उरण तालुक्याचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणा वरील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने महावितरण विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र, महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी सर्रास सिमेंट ऐवजी मातीचा वापर केला आहे. तसेच, विद्युत वाहकांकडून लोखंडी पोलांना आधार देण्याचे काम ही केले जात नाही. त्यामुळे मातीत उभे करण्यात आलेले लोखंडी पोल लवकरात लवकर सडण्याचा धोका अधिक आहे. एकंदरी पावसाळ्यात, वादळात विद्युत वाहक पोल पडून अपघात होऊन नागरिकांच्या व त्या ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या गायी, म्हशी यांच्या जीवातास धोका निर्माण होणार आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथील महावितरणच्या भ्रष्ट कारभाराची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कार्यालयाकडून कामे सुरू आहेत. जर मातीत पोल उभे केले जात असतील तर त्यावर सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात येणार तरी नागरीकांनी काळजी करू नये, पावसाळ्यात वादळात अपघात झाला तर त्यावेळी बघू सध्या विद्युत पुरवठा करणारे पोल उभे राहतात हे महत्त्वाचे आहे.
– विकास गायकवाड,
उप कार्यकारी अभियंता महावितरण उरण
उरण तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडे अनेक वेळा पाठ पुरवठा केला आहे. त्याची दखल घेऊन सरकारने महावितरण विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. त्या निधीतून संबंधित ठेकेदाराने इस्टिमेट नुसार उत्तम दर्जाचे काम करणे गरजेचे आहे. जर काम निकुष्ट दर्जाचे होत असेल तर याठिकाणी होणाऱ्या नुकसानीला, अपघाताला महावितरण विभाग जबाबदार राहणार आहे.
– गौरव ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते







