। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील पडली आहेत. 6.3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत. भूकंपात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत.
जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जात आहे. या भूकंपात अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचे धक्के रात्री 2 वाजता राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही जाणवले. येथे रात्री 2 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले. मंगळवारी सकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.