नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील नानोशी गाव परिसरात रविवारी (दि.4) 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने नानोशी व लगतच्या परिसरात तातडीने पाहणी केली. नानोशी येथील तलाठ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली असता, भूकंपाची नोंद भूकंपमापन केंद्रावर झाली असली तरी ग्रामस्थांना कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे आढळून आले. तसेच, परिसरात कोणतीही जीवितहानी, वित्तहानी किंवा पडझड झाल्याची नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. हा अत्यंत सौम्य स्वरूपाचा धक्का असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version