खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चेंढरे सभागृहात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामपंचायत चेंढरे सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्राचे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शीबिराचे आयोजन केले होते. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार यांची आकर्षक रांगोळी साकारून त्यावर ८१ दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, उपाध्यक्ष जयेंद्र भगत, वाडगाव सरपंच सरिता भगत, तालुका युवक अध्यक्ष मनोज शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सरचिटणीस आशिष भट, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, प्रीया ढवळे, मीनाक्षी खरसंबळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version