उरणमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

। उरण । वार्ताहर ।

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुका मर्यादित पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच घरगुती गणेशोत्सवासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीसे अशी एकूण 10 बक्षीसे आहेत.

सार्वजनिक मंडळांनी व घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍या भाविकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा फोटो काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील 8097100073, संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे 9702751098 या नंबरवर पाठवावे.

Exit mobile version