जेएसडब्ल्यूचा ‘रंग अभिमानाचा’ विशेष उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मूर्तीकार समुदायासह जेएसडब्ल्यू ग्रुपने सहयोग केला आहे. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित जेएसडब्ल्यू इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे दि. 5 ते 7 ऑगस्ट या कालावधीत पेण गावात आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल या मूर्तिकारांमध्ये जनजागृती करण्याचे जेएसडब्ल्यूचे उद्दिष्ट आहे.

मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील बहुतेक भागात विकल्या जाणार्‍या गणेशमूर्ती रायगड जिल्ह्यात तयार होतात. मूर्तिकार समुदायाने तयार केलेल्या गणेशमूर्ती महाराष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही लोकप्रिय आहेत. म्हणूनच मोठ्या संख्येने मूर्तिकार राहात असलेले पेण या गावाला गणेशमूर्तींचे निवासस्थान म्हणतात. दर वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रातील तलाव, नद्या आणि समुद्रात अशा लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होते. व्हीओसीचे प्रमाण कमी असलेले रंग वापरण्याबाबत सामाजिक जागृती निर्माण करण्याचे आणि समुद्रातील जीवांना असलेला धोका कमी करण्याचे जेएसडब्ल्यू पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी या ग्रुपने पेण येतील मूर्तिकार समुदायाशी हातमिळवणी केली आहे. या मूर्तिकारांना जेएसडब्ल्यू पेंट्स वापरण्याची संधी देऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. जेएसडब्ल्यू पेंट्सचा 1808 रंगांचा पोर्टफोलियो आहे, जे पर्यावरणस्नेही, नॉन-टॉक्सिक आणि पटकन वाळणारे आहेत. जेएसडब्ल्यू स्टील डोल्वी वर्क्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व प्लांट प्रमुख आशिष चंद्रा, मार्केटिंग ऑफिसर अनुराधा बोस, जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे सीईओ अश्‍विन सक्सेना यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

Exit mobile version