। पेण । वार्ताहर ।
शिक्षक राम भोईर, किशोर पाटील आणि विनोद म्हात्रे यांनी पर्यावरण स्नेही गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातुन अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
अंतिम दहामधून चार गणेशभक्तांची विजेते म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक नितीन मधूकर पाटील रामवाडी या गणेशभक्ताने गणपतीची पुर्ण आरास पानांच्या पात्रावळी, पानांचे द्रोण व पळसाची पाने याचा उपयोग करून उत्तम संदेश देणारी सजावट केली होतीत्र तर द्वीतीय क्रमांक गुरूनाथ पाटील रावे यांनी कागदाच्या पुठ्यांपासून तोरणा गडाची प्रतिकृती साकारलेली होती.
तृतीय क्रमांक सोनल गणपत पाटील वाक्रुळ हिने नारळाच्या चोथ्यापासून नारळाची प्रतिकृती तयार करून बाप्पाला विराजमान केले होत. उत्तेजनार्थ विलास लक्ष्मण मोकल वडगाव यांच्या आरासाची निवड करण्यात आली. या अंतिम चार विजेत्यांचा प्रशस्तीपत्रक, आकर्षक सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.