यशवंती महिला बचत गटाचा उपक्रम
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील महिलांनी एकत्र येत दिवाळी सणासाठी आकाश कंदील बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यशवंती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी रोजगार निर्मिती म्हणून बनवलेले पर्यावरण पूरक आकाश कंदील उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारात देखील ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.
नेरळ येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी आपल्या विभागातील गरीब महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी यशवंती महिला बचत दिवाळी सणासाठी विविध प्रकारचे कंदील बनविण्याचे काम करतात. प्रामुख्याने या महिला नवरात्र पासून पर्यवरण पूरक आणि त्यात कधीही धुवून घेता येतील असे कंदील बनवत आहेत. मायक्रॉन पासून बनवलेले हे कंदील आकर्षक असून कल्याण आणि उल्हासनगर येथील बाजारात विक्रीसाठी ठेवले जात असतात. त्या कंदिलाच्या रचनेत प्लास्टिक बॉल, मणी यांचा वापर केला जात असल्याने ते कंदील लवकर खराब देखील होत नाहीत. त्यात दिवाळी सण झाल्यानंतर काढून ठेवले तर पुढील वर्षी पुन्हा वापरता येतील असे आहेत आणि म्हणूनच आम्ही बनवलेले कंदील तात्काळ विक्री होतात अशी माहिती वर्षा बोराडे यांनी दिली. साधारण 50 कंदील यांचे निर्माण या महिला करीत असतात, त्यात कंदीलावरील कलाकुसर पाहिली की आम्ही सर्व महिला दिवसभर बसून जेमतेम दोन तीन कंदील बनवू शकतो हे दिसून येईल. वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे आमचे कंदील हे एका वेळी एक असेच बनवले जातात असून एका प्रकारचा कंदील दुसर्या ठिकाणी दिसणार नाही याची काळजी आमच्या महिला घेत असतात.