। पनवेल । प्रतिनिधी ।
केवाळे बस स्टॉप जवळ काळ्या पिवळ्या रंगाच्या इको टॅक्सीने पादचार्याला धडक दिली. या धडकेत मोहन मुरमुर हा जखमी झाला. या प्रकरणी चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन मुरमुर हा पायी चालत जात असताना हरीग्राम ते केवाळे गावाकडे जाणार्या रस्त्यावरील केवाळे बस स्टॉप जवळ काळ्या पिवळ्या रंगाच्या इको टॅक्सीने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याला ठोकर मारून अपघात केला. त्यात त्याच्या पाठीवर आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. त्याला सुकापुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.







