। मुंबई । वृत्तसंस्था ।
गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. १६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केले होती. आज कोर्टाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील ४ दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.