पेटीएमसह रोजरपेवर इडीची छापेमारी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अंमलबजावणी संचालनालयाने पी.एम.एल. कायदा 2002 अंतर्गत बेंगळुरू कर्नाटकमधील सहा ठिकाणांवर छापेमारी केली आहे. चायनीज लोन अ‍ॅप प्रकरणी तपासादरम्यान ईडीने हा छापा टाकला आहे. ऑनलाईन पेमेंट गेटवे कंपन्यांच्या रोझीपे, पेटीएम आणि कॅसफ्रीच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात येत आहे.
या छापेमारीमध्ये तपास यंत्रणेने मर्चंट आयडी आणि चिनी लोकांच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले 17 कोटी रुपये जप्त केले आहेत.

तपासाचे हे प्रकरण बेंगळुरूतील सायबर क्राइम पोलीस स्टेशनने नोंदवलेल्या 18 एफ.आय.आर.वर आधारित आहे. ही एफ.आय.आर. अनेक संस्था/व्यक्तींविरुद्ध नोंदवण्यात आली असून, यामध्ये मोबाईल अ‍ॅपद्वारे अल्प रकमेचे कर्ज घेऊन संस्था किंवा व्यक्तींची पिळवणूक आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version