ईडीची देशभरात 35 ठिकाणी छापेमारी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ईडीने शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि हैदराबादमध्ये जवळपास 35 ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घाणेरड्या राजकारणासाठी अनेक अधिकार्‍यांचा वेळ वाया घालवला जात असल्याची प्रतिक्रिया दिली. 300 हून अधिक सीबीआय आणि ईडीचे अधिकारी 24 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावा शोधत आहेत. मात्र, त्यांना काहीही पुरावा मिळाला नाही. अनेक अधिकार्‍यांचा वेळ यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी वापरला जात असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version