। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. तेलाचे दर वाढल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्यांना सहन कारावा लागत होता. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. देशातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. सोयाबीन तेलासह, सुर्यफूल तेल, मोहरीचे तेल आणि पाम तेल देखील काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज अर्थ तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
खाद्य तेल स्वस्त
