मलिकांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

। मुंबई । प्रतिनिधी ।
मनी लाँडरिंग प्रकरणी सध्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यात मलिकांची उस्मानाबाद येथील 147 एकर शेतजमीन, वांद्रे पश्‍चिममधील दोन फ्लॅट्स, कुर्ला पश्‍चिममधील 3 फ्लॅट्स, कुर्ला पश्‍चिममधील कमर्शियल युनिट आणि गोवावाला कपाउंडमधील मालमत्तेचा समावेश आहे. मेसर्स सोडियस इन्वेस्टमेंट प्रा. लि. आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या मलिकांच्या मालमत्तांवरदेखील ईडीने टाच आणली आहे.

Exit mobile version