शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा वर्धापनदिन

। कोर्लई । वार्ताहर ।

अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशूविहार प्राथमिक शाळेचा 63 वा वर्धापनदिन संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. गोपाळराव लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळाची शिशूविहार शाळा क्रमांक 1 जुलै 1961 रोजी सुरू झाली. सदर शाळेचे उद्घाटन जे. एस एम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य आ. टी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

शाळेच्या 63 वर्षाच्या वाटचालीबाबत संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर, प्रमुख अतिथी अ‍ॅड. गोपाळराव लिमये, विद्यार्थिनी कुमारी सान्वी बंदरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, सुकुमार भगत, सुषमा सोमण, शिक्षिका सीमा तांडेल, माधुरी बोत उपस्थित होते.

Exit mobile version