नेरळ केंद्रामध्ये शिक्षण परिषद

। नेरळ । वार्ताहर ।
राज्य सरकारचे बदलते शैक्षणिक धोरण याची माहिती व्हावी, यासाठी केंद्र पातळीवरनेरळ कन्या शाळेत दर महिन्याला शिक्षण परिषद आयोजित केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्र प्रमुख शिवाजी धराडे यांनी दिली. कोरोना काळात विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष झाले. जिल्हा परिषद शिक्षकांकडून सर्वसामान्य पालकांच्या अपेक्षा आहेत. त्यासाठी जास्त तासिका घेवून विद्यार्थ्यांना गुणवंत बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धराडे यांनी केले आहे.

या शिक्षण परिषदेत विशेषतज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंजली कोटलकर यांनी सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन या विषयावर मते मांडली.तर सुनीता खैरे यांनी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा याबाबत विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले. लोकेश्री चित्ते यांनी शाळांमधील उपक्रमशील शिक्षक यांच्या यशोगाथा याबद्दल माहिती दिली. यावेळी नेरळ केंद्रातील नेरळ कुंभार आळी, नेरळ कन्या शाळा, नेरळ उर्दू शाळा, आनंदवाडी, वाल्मिकी नगर, टपालवाडी, लव्हालवाडी, जुम्मापट्टी, माथेरान येथील सरस्वती विद्यालय, कोल्हारे, धामोते,जिते,कूंभे,या जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version