| रायगड | वार्ताहर |
राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या संकेतस्थळावर जावून भरावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाख रुपयेपर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे, अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा, अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता8 लाखांपर्यंत असावी, अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा. कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे-अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधारकार्ड, फोटो, आदींचा समावेश आहे.







