विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांची भेट

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
जि.प. प्रा. आदर्श शाळा पिळखेडे, ता. जळगाव, जि. जळगाव या शाळेतील 54 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नाशिक, मुंबई दर्शन अशी आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीनिमित्त विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालय, मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सदिच्छा भेट दिली.

या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षणमंत्री यांनी हितगुज करून शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना 179 पुस्तके, तसेच खाऊसाठी काही रक्कम दिली. पिळखेडे या आदर्श शाळेसाठी ई लर्निंग किट देण्याचे जाहीर केले. या शैक्षणिक सहलीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांनी भेट दिल्याबद्दल मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी विशेष आभार मानले. या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांबरोबर ज्ञानेश्‍वर सोनवणे मुख्याध्यापक, किशोर सोनवणे, शरद राजहंस, सचिन पाटील, मंगलदास भोई, मीरा सनेर, मनीषा मार्कड हे शिक्षक आले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उपसंचालक संदीप संगवे, शिक्षण विभागातील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version