| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील तक्का आदिवासीवाडी प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढून विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी पालकांना प्रवृत्त करुन संपूर्ण जिल्ह्यात तक्का आदिवासीवाडी प्राथमिक शाळा आदर्श शाळा होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अनिल पुलेकर यांनी केले.
तेलवडे सरपंच कल्पना पवार, सदस्य परशुराम वाघमारे, अनिल पुलेकर यांचे सहकारी जया ठाकूर, नंदू भगत, कुमार खोत, नैनिता कर्णिक, अनिल पाटील, माजी सैनिक अनिल विरकुड, अलका पुलेकर, दिपक सोनावणे, मुख्याध्यापक, शिक्षक यांसह विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते.
तक्का आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनिल पुलेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपक्रम राबविला. अलका पुलेकर यांनी शाळेतील वाचनालयासाठी 25 विविध पुस्तके देण्यात आली.