इतिहास विभागाची शैक्षणिक सहल

। म्हसळा । वार्ताहर ।
वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयाची इतिहास विभाग व हिस्टरी असोसिएशनद्वारे शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन कुडा मांदाड लेणीचे ठिकाणी करण्यात आले होते. सहलीत महाविद्यालयाच्या किशोरी वारे, अलिशा जाधव, पूजा भामरे, मिनाज काझी, धनवंती हांडे, अनिशा हांडे, अंजली साळवी, रोशनी नाक्ती या विद्यार्थ्यांबरोबर इतिहास विभाग प्रमुख व हिस्टरी असोसिएशनचे चेअरमन प्रा.डॉ. एस.यू. बेंद्रे, सदस्य प्रा.आर.एस. माशाळे, कर्मचारी अखलाक मुकादम यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version