वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांचे प्रतिपादन
| खोपोली | प्रतिनिधी |
जगभर सायबर क्राईम विक्राळरूप धारण करीत आहे. समाजाला प्रबोधनाची गरज आहे. शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात, असे यांचे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी केले. या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विवीध शाळांमध्ये सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी गेल्या 7 वर्षापासून सातत्याने मार्गदर्शन संपन्न होत असते. याच अनुषंगाने प.पु. गगनगिरी महाराज ज्युनिअर कॉलेज, खोपोली येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
सुरुवातीला स्वागत गीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अभिजित व्हरांबळे, पोलीस अंमलदार सचिन घरत व प्रणित कळमकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी प.पु. गगनगिरी महाराज ज्युनिअर कॉलेज, खोपोलीचे प्राचार्य डॉ.गौरव तिवारी, उप प्राचार्य शाझमिन कर्जिकर, शिक्षिका जस्मिन चहल, विनी नायर, वंदना ओसवाल, पूनम शिंदे, मानसी बोंदार्डे, तांसिम, जुही केळकर, संध्या सुतार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले प्रत्यक्ष अनुभव मांडले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सह-सचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, सह-खजिनदार बनिता साह, महिला संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, सल्लागार नरेंद्र हर्डीकर, गणेश राक्षे, दिवेश राठोड, उबेद पटेल, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, आश्पाक लोगडे तसेच सहज युवाचे सागरिका जांभळे, साहील जांभळे यांनी परिश्रम केले.