धुळीच्या वादळाचा रसायनीत प्रभाव

। रसायनी । वार्ताहर ।
पाकिस्तानातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली आहे. रसायनीतीलही दृश्यमानता काही प्रमाणात कमी झाली आहे.
रसायनीत रविवारी (दि. 23) सकाळपासून धुक्यासारखे वातावरण झाले आहे. तसेच हवेत गारठा असून, परिसरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर, दुपारनंतर परिसरात अधिक गारवा निर्माण झाल्याचे दृश्य होते. शेतकर्‍यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, हे धुळीचे वादळ संपेपर्यंत श्‍वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Exit mobile version